पोलिसांना फुकटात भाजीपाला नाकारल्याने रवानगी तुरुंगात

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

पोलिसांना मोफत भाजीपाला देण्यास नकार दिला म्हणून त्याच्या मुलाला एक महिन्यापासून तुरुंगात डांबून ठेवल्याचा आरोप पटन्यातील एका भाजीपाला विक्रेत्याने केला आहे. त्याच्या मुलाचे वय 14 वर्षे आहे असे त्याचे म्हणणे आहे, तर त्या मुलाचे वय 18 वर्षे असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीसोबत त्याला पकडले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पटना (बिहार)- पोलिसांना मोफत भाजीपाला देण्यास नकार दिला म्हणून त्याच्या मुलाला एक महिन्यापासून तुरुंगात डांबून ठेवल्याचा आरोप पटन्यातील एका भाजीपाला विक्रेत्याने केला आहे. त्याच्या मुलाचे वय 14 वर्षे आहे असे त्याचे म्हणणे आहे, तर त्या मुलाचे वय 18 वर्षे असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीसोबत त्याला पकडले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले असून, 48 तासांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ही गोष्ट राज्याच्या पोलिसांसाठी लाजिरवाणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात बिहार पोलिसांवर आरोप झालेले असून जवळपास 250 पोलिस अधिकाऱ्यांवर बिहार सरकारने निलंबनाची कारवाई केलेली आहे.

मुलाच्या वडिलांनी मुख्यमंत्र्याना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोलिसांनी 20 मार्चला त्याच्या मुलाला पोलिस घरातून घेऊन गेले आहेत. त्याला गुन्हा दाखल केल्यानंतर 24 तासांनी अटक केली असल्याचे देखील या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी त्याच्यासोबत मारहाण केली असून त्याच्याकडून कोऱ्या कागदावर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: fourteen Year Old Jailed Beaten For Allegedly Refusing Free Veggies To Cops