दिल्लीत पुन्हा वाढला कोरोना संसर्गाचा दर; मुख्यमंत्री म्हणाले...

arvind kejriwal
arvind kejriwalarvind kejriwal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचे (corona) रुग्ण वाढू लागले आहे. ही परिस्थिती पाहून चौथ्या लाटेबद्दल लोकांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. तसेच सरकारही सतर्क झाले आहे. सरकार कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. गरज पडल्यास आवश्यक पावले उचलली जातील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगळवारी सांगितले.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिल्लीत कोरोना महामारीचा संसर्ग दर वाढून २.७० टक्के झाला. जो गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक आहे. यामुळे राजधानीत कोरोनाचा पुन्हा प्रसार होण्याची चिंता वाढली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत संसर्ग दर २.८७ टक्के होता. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकारांना सांगितले.

arvind kejriwal
कुठे पाऊस तर कुठे उन्हापासून दिलासा; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

दिल्ली सरकार कोरोनावर (corona) लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत कोरोना विषाणूचा नवीन चिंताजनक प्रकार सापडत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखे काहीही नाही. दिल्लीत दररोज १०० ते २००च्या दरम्यान केसेस येत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांची संख्या कमी होत आहे, असे सोमवारी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते.

संसर्ग दर २.७० टक्के

सोमवारी दिल्लीत कोरोना (corona) विषाणूच्या संसर्गाची १३७ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या १८,६६,३८० झाली आहे. राजधानीत संसर्गाचे प्रमाण वाढले आहे आणि ते २.७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, मृतांची संख्या अजूनही २६,१५७ आहे. ४ एप्रिल रोजी संसर्ग दर ०.५ टक्के होता, जो सोमवारपर्यंत २.७० टक्के झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com