सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांकडून जनतेची फसवेगिरी 

सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांकडून जनतेची फसवेगिरी 

गोवा : भाजप सरकारने गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी कथित खाण घोटाळा झाला असल्याची राजकीय स्टंट केल्याचे उघड झाले झाले. खाण खात्याने 35 हजार कोटीं रूपये या घोटाळ्याप्रती वसूल करण्याची गरजच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याप्रकरणी सत्यपरिस्थिती उघड करावी. त्यांनी गोव्याच्या जनतेची तसेच काँग्रेसला बदनाम केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. 

2011 मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोक लेखा समिती अहवालात 25 हजार कोटींचा खाण घोटाळा असल्याचा दावा केला होता मात्र हा अहवाल विधानसभेत आलाच नाही, त्यामुळे काहीच महत्त्व नव्हते. शहा आयोगाने दिलेल्या अहवालात 35 हजार कोटींचा बेकायदा खाण घोटाळा झाल्याचे म्हटले होते मात्र ही माहिती अस्थायी असून त्याची पडताळणीची आवश्यकता आहे असे नमूद केले होते. 2016 मध्ये खाण खात्याने एका नागरिकाला दिलेल्या उत्तरात बेकायदा खनिज उत्खन 579 हेक्टर एकर जमिनीत नव्हे तर फक्त 9 हेक्टर एकरमध्ये झाले आहे त्यामुळे 35 हजार कोटी वसुलीचा प्रश्नच येत नसल्याचे पत्रक आज पत्रकार परिषदेत उघड करून मुख्यमंत्री पर्रीकरांनी सत्तेसाठी केलेली लोकांची फसवेगिरी व दिशाभूल उघड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com