
कुडची, रायबाग, खानापूर आदी मार्गावर काही ठिकाणी महिलांनी बस वाहकासोबत हुज्जत घातली. मात्र, वाहकाने तिकीट घेऊनच महिलांना बसमध्ये प्रवेश दिला.
Karnataka : मोफत बस प्रवासाची घोषणा हवेतच! अद्याप सरकारकडून आदेशच नाही, महिलांचा तिकीट काढून प्रवास
बेळगाव : परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी (Ramalinga Reddy) यांनी १ जूनपासून परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलांना (Women) मोफत प्रवास (Free Bus Travel) देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात परिवहन मंडळाला अशा प्रकारचे कोणतेही आदेश बजावण्यात न आल्याने आज परिवहन मंडळाच्या बसमध्ये अनेक ठिकाणी महिला आणि वाहकांमध्ये वादावादीचा प्रसंग घडला.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) आपल्या जाहीरनाम्यात महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. काँग्रेस सत्तेवर येताच महिलांनी बस तिकीट काढण्यास नकार देत अनेकवेळा वाहकांसोबत वाद घातला. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री रेड्डी यांनी एक जूनपासून महिलांना मोफत बससेवा उपलब्ध होईल, असे जाहीर केले होते.
त्यामुळे खानापूर, रायबाग, कुडची येथून रेल्वेने येणाऱ्या महिलाही मोफत प्रवासाच्या घोषणेमुळे गुरुवारी बसने प्रवास करू लागल्या. रेल्वे आणि खासगी प्रवासी टेम्पोने प्रवास करणाऱ्या महिलांचीही परिवहनच्या बसेसना मोठी गर्दी झाली.
बसमध्ये वाहकाने महिलांकडे तिकिटाची विचारणा करताच महिलांनी आजपासून बसप्रवास मोफत असल्याचे मंत्र्यांनी जाहीर केल्याचे वाहकाच्या लक्षात आणून दिले, पण तसा कोणताही अधिकृत आदेश आला नसल्याचे वाहकाने सांगत प्रत्येक महिलांकडे तिकीट घेण्याची विनंती केली.
बसमध्ये वाहकाने महिलांकडे तिकिटाची विचारणा करताच महिलांनी आजपासून बसप्रवास मोफत असल्याचे मंत्र्यांनी जाहीर केल्याचे वाहकाच्या लक्षात आणून दिले, पण तसा कोणताही अधिकृत आदेश आला नसल्याचे वाहकाने सांगत प्रत्येक महिलांकडे तिकीट घेण्याची विनंती केली.
शासनाकडून घोषणा जरी झालेली असली, तरी तसे अधिकृत आदेश अद्याप परिवहन मंडळाला मिळालेले नाहीत. परिवहनच्या बेळगाव विभागाकडे आदेश न आल्याने गुरुवारी महिलांना तिकीट काढण्याची विनंती करण्यात आली. अधिकृत आदेश येताच महिलांना मोफत बसप्रवास उपलब्ध करून दिला जाईल.
-के. के. लमाणी, डीटीओ, बेळगाव विभाग