केरळमध्ये गरिबांना मिळणार फ्री इंटरनेट

Internet
Internet

नवी दिल्ली - केरळ सरकार राज्यातील दारिद्य्ररेषेखालील २० लाख कुटुंबांना आता मोफत इंटरनेट पुरविणार असून, या संदर्भातील महत्त्वाकांक्षी के-फॉन प्रकल्पास आज सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी राज्यभर नव्याने ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क उभारले जाणार आहे. ‘केरळ आयटी इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड’ ही कंपनीही सरकारला साहाय्य करेल. यामुळे राज्यातील प्रत्येक घर, कार्यालये आणि शाळा परस्परांशी जोडल्या जातील.

या भव्य प्रकल्पासाठी ‘केरळ इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डा’च्या मदतीने १ हजार ५४८ कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार असून, ही संस्था राज्य सरकारचे गुंतवणूक मंडळ म्हणून काम करते. याच संस्थेने मध्यंतरी लंडन स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये मसाला रोख्यांची नोंद केली होती. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी २०२० ची डेडलाइन ठरविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com