आंध्रात 'कॅशलेस'साठी मोफत मोबाईल योजना

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

विजयवाडा- केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर सामान्य जनतेसह अनेकांना त्याचा फटका बसला. या समस्येवर मात करण्यासाठी "कॅशलेस' व्यवहार हा उपाय असून, त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना मोफत मोबाईल वाटप करण्याचा विचार आंध्र प्रदेश सरकार करीत आहे.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याविषयीचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंक आणि अन्य बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर केला. कॅशलेस व डिजिटल व्यवहारांसाठी प्रत्येकाकडे मोबाईल फोन असणे गरजेचे आहे. म्हणूनच ही कल्पना आम्ही मांडली असून, मोबाईल वाटप करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, असे नायडू यांनी सांगितले. तीन हजार कोटी नव्या नोटा सोमवारपर्यंत (ता. 28) राज्यात पोचतील. यात कमी मूल्याच्या नोटांची संख्या 60 कोटी असण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती "आरबीआय'च्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

नोटाबंदीनंतर उद्‌भवलेले प्रश्‍न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही, तोपर्यंत टेलिकॉन्फरन्सिंद्वारे परिस्थितीचा आढावा सातत्याने घेण्याची सूचना नायडू यांनी अधिकाऱ्यांना केली. "आरबीआय'चे प्रतिनिधी हरी शंकर, आंध्र बॅंकेचे उपसरव्यवस्थापक जी. एस. कृष्ण राव व इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Web Title: free mobile handset for cashless scheme