लखनौत अवतरली 'मोदी जिलेबी'; मोफत वितरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

लखनौ (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्याने अनोख्या पद्धतीने मोदींना पाठिंबा दर्शविला आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वीटमार्टचे दुकान चालविणाऱ्या या चाहत्याने आपल्या दुकानात 'मोदी जिलेबी' तयार केली असून ती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.

सुरेश साहू असे या चाहत्याने नाव आहे. "मोदी जिलेबी'चे वैशिष्ट्य म्हणजे या जिलेबीचा आकार हा मोदी या शब्दाप्रमाणे तयार करण्यात आला आहे. या अनोख्या कल्पनेमुळे आणि जिलेबी मोफत असल्याने साहूच्या दुकानात गर्दी झाली आहे. या अनोख्या कल्पनेबाबत बोलताना साहू म्हणाले, "प्रदीर्घ काळापासून मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे मी पक्षाच्या कामासाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने आपला पाठिंबा असल्याचे दाखवून देण्याचा निर्णय घेतला.' तर जिलेबी तयार करणाऱ्या एका कामगाराने अशी जिलेबी तयार करण्यासाठी खूप सराव करावा लागल्याचे सांगितले.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल साहू यांचे कौतुक केले. "ज्यावेळी मी घराबाहेर पडलो आणि येथे पोहोचलो तेव्हा मला मोदी या शब्दाच्या आकाराप्रमाणे जिलेबी दिसली. मला फार आनंद झाला'. अशा प्रतिक्रिया भाजप नेते कौशल किशोर यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Free 'Modi Jilebi'