पाऊस, बर्फवृष्टीने हिमाचलचा पारा खाली

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

शिमला : पाऊस, बर्फवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे हिमाचल प्रदेशमधील तापमानाचा पारा खाली आला आहे. हिमाचल प्रदेशातील 13 हजार 50 फूट उंचीवरील रोहतांग पास आणि किलॉंग या उंचावरील भागात हलक्‍या स्वरूपाची बर्फवृष्टी झाली असून, जिल्हा मुख्यालय असलेल्या लाहौलसुद्धा या बर्फवृष्टीत सापडले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून किलॉंग येथे पाऊस पडत असून, आतापर्यंत 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुंदरनगर मंडी येथे 18.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर कालपा 15.8 मिमी पाऊस सकाळी साडेआठपर्यंत झाल्याची नोंद झाली आहे. त्याशिवाय भूंतरमधील कुल्लू येथे 14.8 मिमी, मंडी आणि नहन येथील सिरमउर येथे प्रत्येकी 10.2 मिमी पावसाची नोंद झाली.

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या मनाली येथे सात मिमी, त्याशिवाय उनामध्ये 6.8 मिमी, जुबेरहती विमानतळावर चार मिमी, कांगरा येथील धर्मशाळा येथे 1.8 मिमी आणि शिमला 1.5 मिमी येथे पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. केलॉंग हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले तेथे चार अंश तापमानाची नोंद झाली, त्याशिवाय कालपा येथे सहा अंश, मनालीला 8.6, शिमला 11.3, नहनला 13 अशी तापमानाची नोंद झाली. आगामी 24 तासात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: The freezing of the Himachal by rain and snow