अकरावी प्रवेशाची आज पहिली यादी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सायन्स, कॉमर्स आणि आर्टस शाखेची पहिली गुणवत्ता यादी उद्या (ता. 5) सकाळी 11 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या 16,466 विद्यार्थ्यांची या यादीत वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सायन्स, कॉमर्स आणि आर्टस शाखेची पहिली गुणवत्ता यादी उद्या (ता. 5) सकाळी 11 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या 16,466 विद्यार्थ्यांची या यादीत वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. 

दहावी परीक्षेत यंदा 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यंदाची पहिली गुणवत्ता यादी 90 टक्‍क्‍यांवरच बंद होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी 6 ते 9 जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्‍चित करावा लागेल. पहिल्या यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील 10 जुलैला जाहीर होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीतील कटऑफही प्रसिद्ध केली जाणार आहे. 

दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी अर्ज भरण्याची मुदत 10 व 11 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. दुसरी यादी 13 जुलैला प्रसिद्ध होईल. विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांच्या चार नियमित फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बायफोकल शाखेत प्रवेश हवा असल्यास बायफोकलच्या रिक्त जागांसाठी महाविद्यालयीन स्तरावर अर्ज भरून आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत. 

शाखानिहाय प्रवेश अर्ज 
कला ः 19,400 
वाणिज्य ः 1,43,368 
विज्ञान ः 66,887 
एमसीव्हीसी ः 1,485 

Web Title: frist list for Eleventh entrance declared today