esakal | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका
sakal

बोलून बातमी शोधा

Desh

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचा वेग कायम असून या दरांनी आज गेल्या तीन वर्षांतील नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्याने देशांतर्गतही किमतीतही मोठी दरवाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमती २५ पैशांनी वाढल्याने हे दर १०१.६४ रुपये प्रतिलिटरवरून १०१.८९ रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढणार : प्रशांत काटे

डिझेलच्या दरात ३० पैशांनी वाढ झाल्याने हे दर लिटरमागे ८९.८७ पैशांवरून ९०.१७ रुपयांवर गेले आहेत. 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कडून ही माहिती देण्यात आली. मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे १०७.९५ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर लिटरमागे ९७.८४ रुपयांवर पोचले आहेत. गत काही दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये तीनदा दर डिझेलच्या दरात सहावेळा वाढ झाली. मुंबईतही इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. २१ ऑगस्टपर्यंत स्थिर असलेल्या इंधनाच्या दरात हळूहळू घट होत असताना अचानक २८ सप्टेंबरपासून वाढ सुरू झाली आहे. कोरोनानंतर आधीच सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना त्यांना इंधनाच्या वाढत्या दराचा सामना सुद्धा करावा लागतो आहे. शिवाय ते मालवाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागण्यास पूरक ठरत आहे.

loading image
go to top