इंधनदरकपात थांबली 

पीटीआय
शुक्रवार, 15 जून 2018

पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दोन आठवडे झालेल्या कपातीनंतर बुधवारपासून इंधनदर कपात थांबली आहे.

नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दोन आठवडे झालेल्या कपातीनंतर बुधवारपासून इंधनदर कपात थांबली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 जूनला प्रतिलिटर अनुक्रमे 15 व 10 पैसे कपात झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून काल (ता.13) आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 76.43 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 67.85 रुपये होता. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी आहे. दिल्लीत 29 मे रोजी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 78.43 रुपये आणि डिझेलचा दर 69.31 रुपये या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने 14 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. या काळात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये आणि डिझेलचा दरात प्रतिलिटर 1.46 रुपये कपात झाली आहे. 

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात सलग 19 दिवस देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. निवडणूक संपल्यानंतर 14 मेपासून ही वाढ पुन्हा सुरू झाली. त्यानंतर पंधरवड्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये वाढ झाली होती. 

दिल्लीतील उच्चांकी भाव (प्रतिलिटर) 
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 
पेट्रोल : 78.43 रुपये 
डिझेल : 69.31 रुपये 
(29 मे 2018) 

संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) 
पेट्रोल : 76.06 रुपये 
(14 सप्टेंबर 2013) 
डिझेल : 56.71 रुपये 
(13 मे 2014) 

Web Title: Fuel price tariffs stopped