खुशखबर ! इंधनाच्या दरात अडीच रुपयांनी कपात

खुशखबर ! इंधनाच्या दरात अडीच रुपयांनी कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून इंधनावरील दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दीड तर कंपन्यांकडून एक रुपयांनी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) दिली. 

- अरुण जेटली यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -

- कच्च्या तेलात वाढ झाल्याने इंधनाच्या दरात वाढ

- महसूल तीन विभागात वाटण्यात येत आहे.

- जकात करात आम्ही कपात करणार आहोत.

- केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात.

- केंद्र सरकारकडून दीड रुपये तर कंपन्यांकडून एक रुपयांची प्रतिलिटरसाठी कपात.

- व्हॅट अंतर्गत सूट द्या अशी विनंती राज्य सरकारांना करण्यात येणार आहे. 

-  केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी, अशी विनंतीही करण्यात येणार आहे.

- त्यामुळे पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी कमी आकारावा म्हणजे ग्राहकांना पाच रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल.

- यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांशी चर्चा करणार आहोत.

-  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com