मल्ल्या, मोदींसारख्यांची मालमत्ता होणार जप्त...

वृत्तसंस्था
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या हा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून फरार होण्यात यशस्वी झाल्यानंतर अशा स्वरुपाचा कायदा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या कायद्याची निर्मिती करण्यासाठीचे निर्देश सक्तवसुली संचलनायास देण्यात आले आहेत

नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहार करुन देशाबाहेर पळून गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारकडून लवकरच मांडण्यात येईल, अशी शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

"फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल' या विधेयकाद्वारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असलेल्या या विधेयकास कायदा मंत्रालयाने काही सूचनांसहित मान्यता दिली आहे. कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या हा सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून फरार होण्यात यशस्वी झाल्यानंतर अशा स्वरुपाचा कायदा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या कायद्याची निर्मिती करण्यासाठीचे निर्देश सक्तवसुली संचलनायास देण्यात आले आहेत.

मल्ल्याबरोबरच नीरव मोदी हा आणखी एक भारतीय उद्योगपती पीएनबी बॅंकेस "फसवून', 11 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करुन फरार झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: fugitive economic offenders bill nirav modi vijay mallya