प्रियकरासाठी तिने घरातच केली एक कोटीची चोरी

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

गुजरातमधील एका तरूणीने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी घरातच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणीने घरातून दागिने आणि रोकड मिळून जवळपास एक कोटी रुपयांची चोरी केली आहे. बेंगळुरूमध्ये पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराच्या मदतीसाठी तरुणीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोघांनाही अटक केली आहे.

राजकोट- गुजरातमधील एका तरूणीने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी घरातच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणीने घरातून दागिने आणि रोकड मिळून जवळपास एक कोटी रुपयांची चोरी केली आहे. बेंगळुरूमध्ये पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराच्या मदतीसाठी तरुणीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोघांनाही अटक केली आहे.

प्रियंका परसाना (वय 20) या तरुणीचे दोन वर्षांपासून हेत शाह (वय 20) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हा चोरीचा प्रकार घडल्यानंतर प्रियंकाच्या वडिलांकडून चोरीची तक्रार आल्याच्या 17 दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. तिच्या वडिलांनी राजकोटच्या भक्तिनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. आपला प्रियकर हेत शाह याला पायलट बनण्यासाठी ती मदत करत होती आणि त्यासाठीच घरी चोरी करण्याचा निर्णय तिने घेतला आणि 29 नोव्हेंबर रोजी घरीच चोरी केली. हे प्रकरण कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून घरी चोरीचा झाल्याचे दाखवण्यासाठी तिने घरात तोडफोडही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 90 लाख रुपयांचे 3 किलो सोन्याचे दागिने, 2 किलो चांदीचे दागिने आणि 64 हजार रुपयांची रोकड घरातून तिने लंपास केली, घरात कोणी नसताना हा प्रकार तिने केला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडिल घरी आल्यावर त्यांना घरात काहीतरी गडबड झाल्याचं कळलं आणि घरात चोर शिरल्याची तक्रार त्यांनी तातडीने पोलिसांत केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली मात्र, जबरदस्ती घरात प्रवेश केल्याचे कोणतेच निशाण त्यांना मिळाले नाहीत आणि कपाट ड्युप्लिकेट चावीने उघडल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले तसंच प्रियंकाची चौकशीही केली मात्र त्यांना काही पुरावे मिळाले नाहीत. मग तिच्यावर लक्ष ठेवलं आणि तिचे हेत शाह याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं त्यांना समजलं. पोलिसांनी हेतची चौकशी केली असता चौकशीत प्रियंकाने चोरीचं प्लॅनिंग केल्याचं त्याने कबुल केलं. हेतला वैमानिक बनायचं होतं, त्यासाठी त्याला 20 लाख रुपयांची गरज होती. त्याचं वैमानिक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रियंकाने घरातच चोरी केली.

Web Title: To Fund Pilot Training Course Of Boyfriend Girl Robs Own House