सागर मोहिमेसाठी दहा हजार कोटी

पीटीआय
बुधवार, 10 मे 2017

या प्रकल्पाच्या तांत्रिक सहकार्यासाठी इतर देशांची मदत घेण्याचीही भारताची तयारी आहे. अत्यंत जबाबदार पद्धतीने, पर्यावरणाची हानी न करता सागरतळातील नैसर्गिक साधनसंपत्ती शोधण्याचा हा प्रयत्न असेल

तितागड  - सागरतळाशी असलेल्या खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी खोल समुद्रात मोहीम सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पाबाबतच्या मान्यतेसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन नायर राजीवन यांनी सांगितले.

"या प्रकल्पाच्या तांत्रिक सहकार्यासाठी इतर देशांची मदत घेण्याचीही भारताची तयारी आहे. अत्यंत जबाबदार पद्धतीने, पर्यावरणाची हानी न करता सागरतळातील नैसर्गिक साधनसंपत्ती शोधण्याचा हा प्रयत्न असेल. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी हे योग्य पाऊल आहे,' असे राजीवन म्हणाले. या प्रकल्पामुळे ऊर्जा, मासेमारी, खनिजे या क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Funds for Sea Exploration