शहीद जवान प्रकाश जाधव यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

राजेंद्र हजारे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

निपाणी - जम्मू येथील पुलगाव येथे अतिरेक्यांशी लढताना सोमवारी रात्री बुदिहाळ (ता. निपाणी) येथील जवान भोजराज उर्फ प्रकाश जाधव हे शहीद झाले. काल बुधवारी त्यांचे पार्थीव विशेष विमानाने बेळगाव येथे अाणण्यात आले. त्यानंतर आज सकाळी नऊच्या सुमारास बुदिहाळ येथे पार्थिव आणला. त्यावेळी प्रकाश यांच्या आई वडिलांसह पत्नीने फोडलेला हंबरडा सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्यावर लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश जाधव अमर रहेच्या घोषणेत बुदिहाळ गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. टाळमृदंग, भजन, घोषणांचा दणदणाट मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्या मार्गावर महिला व युवती आरत्या घेऊन उभ्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गावातील विविध तरुण मंडळासह विद्यार्थी तिरंगा झेंडा हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.

जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्ता मिळेल तेथून नागरिक गर्दी करत होते. शिवाय चौकाचौकात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर निपाणीतील श्रीराम सेनेने आकर्षक रांगोळय़ा रेखाटून शहीद जवान प्रकाश जाधव यांना आदरांजली वाहिली. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत मिरवणुकीची रांग लागली होती.

Web Title: funeral of Shahid Jawan Prakash Jadhav