पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घाला

यूएनआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

एखादी व्यक्ती जर तुम्हाला मारण्यासाठी येत असेल आणि तुम्ही जर तिच्या घरामध्ये तिला खायला अन्न आहे की नाही, हे विचारण्यासाठी जात असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घातली जावी या मताचा मी आहे. आपल्याला त्यांची गरज का आहे?

नवी दिल्ली -  फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. उभय देशांमध्ये तणाव असताना ही मंडळी जर आपले मनोरंजन करणार असतील तर ती चुकीची बाब असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.

एखादी व्यक्ती जर तुम्हाला मारण्यासाठी येत असेल आणि तुम्ही जर तिच्या घरामध्ये तिला खायला अन्न आहे की नाही, हे विचारण्यासाठी जात असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घातली जावी या मताचा मी आहे. आपल्याला त्यांची गरज का आहे? भारतामध्ये येथे दहा हजारांपेक्षाही अधिक तरुण रोजगारासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे असतात. तेव्हा आपण आपल्या लोकांना रोजगार देण्याऐवजी त्यांना येथे का आणत आहोत, असा सवालही त्यांनी केला. निर्माते केवळ आपल्या मार्केटिंगसाठी दुसरी जागा मिळत असल्याने त्यांना येथे प्रमोट करायचे काम करतात. यामागे कलात्मकतेपेक्षाही केवळ मार्केटिंग आणि आर्थिक घटक हे दोनच मुद्दे केंद्रस्थानी असतात, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: gajendra chauhan demands permanent on artistes from Pakistan