इंग्रजांनी एका भारतीयाचं नाव गलवान खोऱ्याला का दिलं?

galwan
galwan

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. ज्या खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले त्या गलवान भागाचा शोध लेहमधील रसूल गलवान यांनी लावला होता. त्यांची चौथी पिढी सध्या भारतात राहत आहे. लडाखमध्ये राहणाऱ्या रसूल गलवान यांच्या वंशजांनी माहिती दिली आहे. त्यांच्याच नावावरून गलवान खोऱ्याला नाव पडलं आहे. सध्या त्यांचे वंशज गेस्ट हाउस चालवतात. 

गलवान खोऱ्याला दिलेलं नाव आपल्या पणजोबांवरून आहे हे त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांनाही माहिती नव्हतं. भारत चीन यांच्यात संघर्ष झाल्यानंतर ही माहिती त्या लहान मुलांना झाली. रसूल गलवान यांचा नातू मोहम्मद अमीन हे युरटुंग भागात एक लहान गेस्ट हाउस चालवतात. याआधी ते जिल्हाधिकारी कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. 

अमीन यांनी गलवान हे नाव कसं पडलं आणि आजोबा काय करायचे याची माहिती दिली. अमीन म्हणतात की, माझे आजोबा 12 व्या वर्षी गाइडचं काम करत होते. 10 दिवस पायी लडाख ते जोझिला दरा पार करून काश्मीरला जायचे. असंच एकदा इंग्रजांसोबत ट्रेकिंग करून काराकोरमजवळून अक्साई चिनवरून जात होते. त्यावेळी लोक एका उभ्या पर्वताजवळ अडकल्याचे दिसले. पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. तेव्हा आजोबांनी रस्ता शोधला आणि इंग्रजांना पलिकडे जाण्यास मदत केली. तेव्हा इंग्रजांनी खूश होऊन आजोबांचे नाव त्या ठिकाणाला दिलं. 

रसूल गलवान यांचा मृत्यू 1925 मध्ये झाला. त्यांच्यानंतर अमीन यांच्या वडिलांनी आजोबांची ही कथा त्यांना सांगितली होती. अमीन यांच्याकडे आजोबांची आठवण म्हणून एकमेव पुस्तक आहे. जे त्यांनी 1995 मध्ये रिप्रिंट करून घेतलं होतं. लंडनच्या मुझियममधून ते आणलं होतं. या पुस्तकात रसूल गलवान यांचा एकमेव फोटो आहे. 

लेहमध्ये रसूल गलवान जिथं राहत होते तिथं एक म्युझियम उभारण्यात आलं आहे. अमीन म्हणतात की घर आणि त्याच्या आजुबाजूला रस्ता असलेली सर्व जमीन त्यांच्या आजोबांना इंग्रजांनी दिली होती. जमीनीची ही लढाई चीनसोब आहे का असा प्रश्न विचारताच ते म्हणाले की, जर गलवान खोऱ्याचे नाव त्यांच्या आजोबांच्या नावाने आहे आणि ते भारतीय आहेत तर जमीन चीनची कशी झाली? 

आजोबांच्या नावाने ज्या ठिकाणाला ओळखलं जातं ते ठिकाण अजुनही त्यांच्या वंशजांनी पाहिलेलं नाही. काश्मिरींनीसुद्धा रसूल गलवान यांची आठवण असलेलं पुस्तक रिप्रिंट केलं आहे मात्र यासाठी गलवान कुटुंबियांची परवानगी मात्र घेतली नाही. 

अमीन यांनी असंही सांगितलं की, माझे आजोबा लडाख मधील पहिली व्यक्ती होते जे इंग्लिश ट्रेकर्सना गाइड करत होते. 1888 मध्ये लेहमधन अक्साई चीनकडे गेलं. रसूल गलवान 14 वर्षांचे असताना त्यांनी या रस्त्याने ब्रिटिश एक्सप्लोररला त्याला जिथं जायचं होतं तिथं पोहोचवलं होतं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com