जुगारात पत्नी पणाला अन् मित्रांनाच करायला लावला बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

या प्रकरणी आपल्यावर दोन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात दारु आणि जुगाराच्या आहारी गेलेला संबंधित व्यक्तीने नेहमीप्रमाणे मित्रांसोबत जुगार खेळत होता. खिशातील पैसे संपल्यामुळे यावेळी त्याने थेट आपल्या पत्नीलाच पणाला लावले.

लखनौ : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून, एका दारुड्या नवऱ्याने जुगार खेळताना पत्नीला पणाला लावले आणि हरल्यानंतर मित्रांनीच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. 

या प्रकरणी आपल्यावर दोन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात दारु आणि जुगाराच्या आहारी गेलेला संबंधित व्यक्तीने नेहमीप्रमाणे मित्रांसोबत जुगार खेळत होता. खिशातील पैसे संपल्यामुळे यावेळी त्याने थेट आपल्या पत्नीलाच पणाला लावले. महिलेचे दुर्दैव म्हणजे तरुण जुगारात हरला. त्यानंतर त्याच्या दोघा मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

अरुण आणि अनिल या पतीच्या मित्रांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार इथवरच थांबला नाही. महिला नवऱ्यावर चिडून मामाच्या घरी राहायला गेली होती. मात्र त्याने तिची समजूत काढून माफी मागितली. त्यामुळे दाम्पत्य पुन्हा आपल्या घरी येण्यास निघाले. परंतु वाटेत पतीने कार थांबवली आणि त्यावेळी त्याच्या मित्रांनी दुसऱ्यांदा महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambler loses to friends asks them to gang-rape his wife in Uttar Pradesh: