गांधी कुटुंबीयांनी 'INS विराट'चा वापर पर्यटनासाठी केला : मोदींचा आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. 

नवी दिल्ली: राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मोदी यांनी राजीव गांधी यांना लक्ष्य करत, जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांच्यावर टीका झाली होती. 

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी कुटुंब काही खास मित्रांसोबत लक्षद्वीप येथील बंगाराम बेटावर त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. यावेळी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत या पर्यटनात राहुल आणि प्रियंका गांधी यांचे मित्र, सोनिया गांधी यांची बहीण तसेच कुटुंब, सोनिया गांधी यांची आई, भाऊ आणि मामा सहभागी होते. तसेच राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंही सोबत होती. तीन मुलांमध्ये अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांच्या मुलीचाही समावेश होता. गांधी कुटुंबीयांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र तरीही ही बातमी माध्यमांसमोर आली. त्यानंतर अनेक विवाद झाले. राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhi family used INS Viraat as personal taxi Says Modi