युगांडामध्ये उभारणार गांधी वारसा केंद्र : मोदी 

Gandhi Heritage Center to be set up in Uganda says Modi
Gandhi Heritage Center to be set up in Uganda says Modi

कम्पाला (युगांडा) : महात्मा गांधी यांच्यासारख्या वैश्‍विक आणि जीवनमूल्ये जोपासणाऱ्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ज्याठिकाणी त्यांच्या अस्थीचा एक भाग विसर्जित करण्यात आला, त्या पवित्र जागी गांधी वारसा केंद्र उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. 

युगांडाच्या संसदेत भाषण करताना मोदी म्हणाले, की गांधी यांचे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची कथा आफ्रिकेशी जोडली गेलेली आहे. महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या मोहिमेला आकार देण्यामधील आफ्रिकेची भूमिका आठवणीत राहावी यासाठी केंद्र उभारण्यापेक्षा दुसरी चांगली आदरांजली ठरू शकत नाही. त्यांच्या मोहिमेने आफ्रिकेलाही स्वातंत्र्य आणि न्यायाची प्रेरणा दिली आहे. कम्पालापासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिंजा येथील पवित्र ठिकाणी गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्याच ठिकाणी आम्ही गांधी वारसा केंद्र उभारू, असे मोदी म्हणाले. 

व्यापारातील असंतुलन दूर करू 

युगांडाच्या अध्यक्षांच्या भाषणातील भारत-युगांडा दरम्यान व्यापारामध्ये असंतुलन असल्याचा धागा पकडत मोदी यांनी, हे असंतुलन दूर करणायासाठी मी येथे आलो असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की भारत एक कायद्यानुसार चालणारा देश आहे. येथे कर स्थिरता आणि निश्‍चित कर आकारणी केली जाते. त्यामुळेच भारताला कोणत्याही देशात गुंतवणूक करणे सोपे आहे. जेव्हा अफ्रिका संघर्षाच्या काळातून जात होता. तेव्हा कोणताही देश युगांडासोबत नव्हता. मात्र, आम्ही तेव्हादेखील युगांडा सोबत होतो, याचा इतिहास साक्षी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com