'गणेश' बिअर, 'ओम' बूट विक्रीवर बंदी आणावी: नरेश कद्यान

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - अमेरिकेतील एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर गणेशाचे चित्र असलेली बिअर आणि दुसऱ्या एका साईटवर ओम चिन्ह असलेले बूट विक्री होत असल्याची तक्रार भारत स्काऊट आणि गाईडचे आयुक्त नरेश कद्यान यांनी केली आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेतील एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर गणेशाचे चित्र असलेली बिअर आणि दुसऱ्या एका साईटवर ओम चिन्ह असलेले बूट विक्री होत असल्याची तक्रार भारत स्काऊट आणि गाईडचे आयुक्त नरेश कद्यान यांनी केली आहे.

अमेरिकेतील yeswevibe.com या ऑनलाईन शॉपिंग साईटवर "ओम' चिन्ह असलेले बूट विक्री करण्यात येत आहेत. तर lostcoast.com या साईटवर गणेशाचे चित्र असलेली बिअर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या संदर्भात कद्यान यांनी यापूर्वी तक्रार केली होती. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "ही दोन्ही स्वतंत्र प्रकरणे आहेत. "ओम' चिन्ह असलेल्या बूटाची विक्री होत असलेले आम्हाला आढळून आले आहे. त्याबाबत आम्ही तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी आम्ही पोलिस आयुक्त आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेतली. मात्र, अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर आम्हाला आणखी एक साईट गणेशाचे चित्र असलेली बिअर विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मंगळवारी आम्ही पुन्हा तक्रार केली आहे.'

"आपण या प्रकरणाकडे धार्मिक मुद्या म्हणून पाहू नये; कारण ही चिन्हे लोकांना सकारात्मक ऊर्जा पुरवित आहेत. या उत्पादनांवर दिल्लीत आणि अमेरिकेतसुद्धा बंदी घालण्यात यावी. त्यासाठी आम्ही दिल्ली पोलिसांना दोन दिवसांची मुदत देत आहोत. जर त्यांनी काही कारवाई केली नाही, तर आम्ही भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांकडे जाणार आहोत', असेही कद्यान पुढे म्हणाले.

Web Title: Ganesh beer, om shoes; will ensure these products are banned in Delhi