आमदार गणेश हुक्केरी यांची मुख्य पक्षप्रतोदपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांची राज्यातील आघाडी सरकारच्या मुख्य पक्षप्रतोदपदी बुधवारी (ता. 4) निवड करण्यात आली. विधानसभेचे सभापती रमेशकुमार यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांच्या निवडीने चिक्कोडी सदलगा-विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांतून जल्लोष करण्यात आला. 

चिक्कोडी- चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांची राज्यातील आघाडी सरकारच्या मुख्य पक्षप्रतोदपदी बुधवारी (ता. 4) निवड करण्यात आली. विधानसभेचे सभापती रमेशकुमार यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांच्या निवडीने चिक्कोडी सदलगा-विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांतून जल्लोष करण्यात आला. 

आमदार गणेश हुक्केरी यांनी 2014 साली झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभेवर विजय मिळविल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत त्यांनी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या विरोधात 32 हजार मताधिक्‍याने विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या विरोधात 10 हजारावर मताधिक्‍याने विजय मिळविला आहे. 

कर्नाटकात धजद व कॉंग्रेस युतीचे सरकार सत्तेवर आले असून या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. भाजपाने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षप्रतोदपदी चिक्कोडीच्या आमदार महांतेश कवटगीमठ यांची निवड केली आहे. त्याला तोडीसतोड म्हणून आमदार गणेश हुक्केरी यांना सरकारचे मुख्य पक्षप्रतोदपदी स्थान देण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Ganesh Hukkeri appointed as party Chief Representative