अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 माजी सैनिकांसह 7 जण अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

अमरावती- आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या 2 माजी सैनिकांसह 7 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार झाले असल्याचीही माहिती सांगण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला थंडपेयातून अमली पदार्थ दिल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने आपल्या मित्रांना बोलावले आणि त्यांनीही त्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला ब्लॅकमेल करून एक वर्षभर तिच्यावर बलात्कार केला असल्याचेही समोर आले आहे.

पीडित मुलगी चिंताग्रस्त दिसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी 9 आरोपींपैकी 7 जणांना 
अटक केली आहे. आरोपींमध्ये 2 माजी सैनिकांचा समावेश आहे. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवत लष्करातून काढण्यात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान, 17 वर्षांची पीडित मुलगी इंटरमिजिएटची विद्यार्थीनी आहे.

Web Title: Gang Rape On Minor Girl 7 Arrested Including 2 Ex Service Man In Andhra Pradesh