Sonia Gandhi Health Update : आता कशी आहे सोनिया गांधींची प्रकृती? रुग्णालयाने दिली महत्वाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi Health Update : आता कशी आहे सोनिया गांधींची प्रकृती? रुग्णालयाने दिली महत्वाची माहिती

Sonia Gandhi Health Update : आता कशी आहे सोनिया गांधींची प्रकृती? रुग्णालयाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने आज (शुक्रवार) सांगितले.

व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनमुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Sonia Gandhi Health Update)

उत्तर प्रदेश सोडून ‘भारत जोडो यात्रा' हरियाणामध्ये पोहोचली आहे. यादरम्यान माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आई सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीला गेले होते. आज ते परत यात्रेत सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा: Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई

ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांची वाराणसी येथे रोड शो दरम्यान प्रकृती खराब झाल्याने पुन्हा दिल्लीला परतावे लागले होते. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: Covid19 Impact : संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब! कोरोना झालेल्या पुरुषांमध्ये कमी होतयं वीर्याचं प्रमाण

यापूर्वी सोनिया गांधी यांना दोनवेळा कोरोना झाला होता. त्यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्यांना अनेक दिवस सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी