बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

या महिलेवर 9 वर्षांपूर्वी सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. मार्चमध्ये लखनौहून रायबरेलीकडे जात असताना रेल्वेमध्ये दोघांनी तिच्यावर ऍसिड फेकले होते. या हल्ल्यातही ती जखमी झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यावेळी तिची भेट घेतली होती.

लखनौ - लखनौमधील अलिगंज भागात शनिवारी रात्री एका 35 वर्षीय बलात्कार पीडित महिलेवर ऍसिड हल्ला करण्यात आला. चौथ्यांदा या महिलेवर ऍसिड फेकण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त अभय कुमार प्रसाद यांनी सांगितले, की अलिगंज भागात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. हॉस्टेलबाहेर ही महिला उभी असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ऍसिड फेकले. चेहऱ्याच्या उजव्या भागाला जखमा झाल्या असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या महिलेवर 9 वर्षांपूर्वी सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. मार्चमध्ये लखनौहून रायबरेलीकडे जात असताना रेल्वेमध्ये दोघांनी तिच्यावर ऍसिड फेकले होते. या हल्ल्यातही ती जखमी झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यावेळी तिची भेट घेतली होती. या महिलेवर 2008 मध्ये तिच्या गावी दोघांनी सामुहिक बलात्कार केला होता. त्यानंतर 2011 मध्ये पहिला आणि 2013 मध्ये ऍसिड हल्ला झाला होता.

Web Title: Gangrape survivor attacked with acid for fourth time in Lucknow