मेरशीत पूर्ववैमनस्यातून दोन गुन्हेगारी गटात गँगवॉर

विलास महाडिक 
रविवार, 3 जून 2018

चिंबल व मेरशी येथील दोन गटात तलवारी, चाकू व पिस्तुलने पूर्ववैमनस्यातून झालेल्या गँगवॉरमध्ये दोन गटातील चारजण गंभीर जखमी झाले.

पणजी - मेरशी मार्केजवळ काल रात्री पावणेचारच्या सुमारास चिंबल व मेरशी येथील दोन गटात तलवारी, चाकू व पिस्तुलने पूर्ववैमनस्यातून झालेल्या गँगवॉरमध्ये दोन गटातील चारजण गंभीर जखमी झाले. ही घटना मेरशी येथील गोवेकर बारजवळ घडली. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी दोन गटातील मिळून आठ जणांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका गटातील जोसुआ तलवार, मुबारक मुल्ला, शेहबाझ मुल्ला, नियाझ बेग, अख्तर मुल्ला, अब्दुल मलदार याचा समावेश आहे तर निसार फरारी आहे. हे सर्वजण चिंबल व आल्तिनो येथील रहिवासी आहेत. दुसऱ्या गटातील विशाल गोलतकर, गौरेश नाईक व मार्सेलिनो डायस यानाही अटक करण्यात आली असून ते मेरशी व कुडका येथील आहेत. पोलिसांनी संशयितांकडून दोन चाकू तसेच दोन मोटारसायकली व 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

या दोन गटात झालेल्या हल्ल्यात चिंबल येथील अतिफ निर्गी, अब्दुल मलदार व समीर मुल्ला यांच्यावर चाकूने व चॉपरच्या जखमा झाल्या आहेत तर मेरशी - कुडका येथील सूरज शेट्ये याच्या डोक्यावर चाकू व चॉपरने गंभीर दुखापत झाली आहे. या चौघांवरही गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Gangwar in two criminal groups at mershi panji

टॅग्स