इन्स्टाग्रामवरून गांजा विकणारा डॉक्टर अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

हैदराबाद- इन्स्टाग्राम या ऍप्लिकेशनवरून गांजाचे विविध पदार्थ तयार करून विकणाऱया डॉक्टरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहम्मद सुजाथ अली खान हा चॉकलेट, विस्की, रममध्ये गांजा मिसळत असे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो विविध पदार्थ तयार करून हैदराबाद, बंगळूर, चेन्नमध्ये विकत असे. शिवाय, या पदार्थांची विक्री करण्यासाठी महिला व विद्यार्थ्यांचा वापर करत होता. नेट बॅंकिंगच्या माध्यमातून तो पैसे घेत असायचा. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर त्याचे 700-800 फॉलोअर्स होते. इन्स्टाग्रामवरून त्याच्या पदार्थांची मागणी नोंदविली जात असे. याप्रकरणी त्याच्या फॉलोअर्सचीही चौकशी केली जाणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ganja sale on Instagram: Doctor arrested