पंजाब, हरियानामुळे दिल्लीचे "गॅस चेंबर'

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंजाब आणि हरियानातील शेतातील कडब्याला लावल्या जाणाऱ्या आगींमुळे दिल्लीचे रूपांतर "गॅस चेंबर'मध्ये झाले आहे. दिल्लीतील "स्मॉग'च्या वाढलेल्या पातळीची केंद्र सरकारने वेळीच गांभीर्याने दखल घेत हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 'सम-विषम प्रयोगामुळे "स्मॉग'च्या पातळीवर फारसा परिणाम होत नसल्याचे प्राथमिक अभ्यासात पुढे आले आहे. पंजाब व हरियानातून येणाऱ्या धुरामुळे येथील वायुप्रदूषणाची परिस्थिती आणखी भीषण बनत आहे. दिल्लीच्या बाहेरची परिस्थिती एकाद्या गॅस चेंबरसारखी बनली असून, त्याला प्रमुख कारण शेजारच्या या दोन राज्यांत मोठ्या प्रमाणात शेतात लावल्या जाणाऱ्या आगी हेच आहे. अनेक दिवस शाळांना सुटी देणे हा यावरचा कायमस्वरूपी उपाय नाही. यासाठी शेतकऱ्यांना काही तरी सवलती त्याचप्रमाणे पर्यायी मार्ग दाखविला पाहिजे जेणेकरून ते हा परंपरागत मार्ग सोडतील.''

ते म्हणाले, 'केंद्र सरकारने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. वाहनांचा धूर आणि शेतातील धूर हेच बाह्य दिल्लीतील "स्मॉग'चे खरे कारण आहे.''

Web Title: gas chamber by punjab, delhi, hariyana