'गौमाता की जय' म्हणत मुस्लिम महिलांना मारहाण

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

भोपाळ - गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन दोन मुस्लिम महिलांना जमावाकडून ‘गौमाता की जय‘ अशा घोषणा मारहाण केल्याची मध्य प्रदेशात घडली आहे. पोलिसांसमोरच महिलांना मारहाण होत असताना काही नागरिक मारहाणीचा मोबाईलवर व्हिडिओ बनविण्यात व्यस्त होते. 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मांडसौर रेल्वे स्थानकावर दोन मुस्लिम महिला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले असतानाही जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघींमधील एक महिला बेशुद्ध पडली तेव्हा जमावाने मारहाण करणे बंद केले. पोलिसांनी जमावाला आवरण्याचा प्रयत्न केला, पण गौमाता की जय अशा घोषणा देत त्यांना मारहाण करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांकडे 30 किलो मांस सापडले होते. तपासणी केली असता हे म्हशीचे मांस असून गोमांस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांकडे मांस विकण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 'Gaumata of Jay' says Muslim women beaten

टॅग्स