गौरी लंकेश प्रकरणातील चौघांचा जामीन फेटाळला

Gauri Lankesh Murder Case
Gauri Lankesh Murder Case

बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीने बंगळूर येथील चौघांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली होती. पण, अटकेच्या भीतीने त्यानी एसआयटीसमोर हजर न होता. मंगळूर येथील पहिले अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोका तसेच बंगळूर येथे दाखल झालेल्या प्रकरणात मंगळूरमध्ये जामीन अर्ज दाखल केला जाउ शकत नाही. असा युक्‍तीवाद सरकारी वकिलांनी केल्याने न्यायाधीश श्रध्दा यानी चौघांचाही जामिन अर्ज फेटाळला आहे. 

मोहन, यतिश एम, यशीन बी आणि कुमुदक्षा सर्वजण (रा. सुलीया बंगळूर) अशी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्यांची नावे आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांना आश्रय दिल्याचा ठपका ठेवून यापुर्वीच मोहन नायक (वय 50, रा. सुलीया बंगळूर) याला एसआयटीने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी एसीआयटीने वरील चौघांना 27 जुलैला नोटीस बजावून 30 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगीतले होते. मात्र, ते सर्वजण चौकशीसाठी हजर न होता अटकेच्या भितीने फरारी झाले आहेत. त्यांनी अलीकडेच मंगळूर येथील न्यायालयात अटकपुर्व जामिनाठी अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकिल राजू पुजारी बन्नदी यानी जामिन मंजुर करण्यास हरकत नोंदविल्याने न्यायाधीशानी त्यांच्या अर्ज फेटाळून लावला आहे. भादंवि कलम 438 कर्नाटका कंट्रोल ऑफ आर्गनाईज्ड क्राईम ऍक्‍ट नुसार जामीन मंजुर करता येत नाही. तसेच बंगळूर येथे दाखल झालेल्या प्रकरणाची मंगळूरमध्ये अर्ज दाखल केला जाउ शकत नाही, असा युक्‍तीवादही सरकारी वकिलांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com