गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातनशी निगडीत 'सर' अटकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एकाला अटक केली आहे. राजेश बंगेरा (वय 50) असे या संशयित आरोपीचं नाव असून तो कर्नाटक राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकारी आहे. मंगळवारी (ता. 24) त्याला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बंगळूरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एकाला अटक केली आहे. राजेश बंगेरा (वय 50) असे या संशयित आरोपीचं नाव असून तो कर्नाटक राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकारी आहे. मंगळवारी (ता. 24) त्याला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

परशुराम वाघमारे व गणेश मिस्कीन (संशयित मारेकरी) यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शिवाय महाराष्ट्र व कर्नाटक भागात अनेक ठिकाणी हिंदू जनजागृती समिती व इतर उजव्या संघटनाशी संबंधीत कार्यकर्त्यांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. बंगेरा याने प्रशिक्षित केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हत्येच्या कटात कशाप्रकारे सामावून घ्यायचे, कुणाला काय काम असेल, याची आखणी अमोल काळे (पुण्यातून अटक केलेला आरोपी) याने केली असा पोलिसांचा आरोप आहे. अमोल काळेच्या डायरीत बंगेराचा उल्लेख 'सर' असा केल्याचे आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधीत ज्या संशयित आरोपींनी हत्या केली आहे. त्यांना 20 काडतुसे पूरवल्याचाही एक महत्वाचा आरोप राजेश बंगेरा याच्यावर आहे. बंगेरा हा कर्नाटकातील मंगळूरचा असून त्याचे अनेक वर्षांपासून सनातन संस्थेशी संबंध असल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: gauri lankesh murder case one arrested