गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी नुकतीच दिली होती. गौरी लंकेश यांनी प्रस्थापित उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी पाच सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती.

बंगळूर - वरिष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज (शनिवार) दोन संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. 

एसआयटीचे प्रमुख बी. के. सिंह यांनी सांगितले, की मारेकऱ्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. नागरिकांकडून सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. नागरिकांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मदत करावी. दोन मारेकऱ्यांची रेखाचित्रे आम्ही प्रसिद्ध करत आहोत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 250 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तीन रेखाचित्रांपैकी दोन मारेकऱ्यांची रेखाचित्रे आहेत. अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून ही रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी नुकतीच दिली होती. गौरी लंकेश यांनी प्रस्थापित उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी पाच सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्याला कर्नाटक सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

Web Title: Gauri Lankesh murder case: Two suspects identified, SIT releases sketches