अब्जाधीशांच्या यादीत अदानींचाही समावेश; पाहा कितीने वाढला क्रमांक

टीम ई-सकाळ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

भारतीयांमध्ये अझीम प्रेमजी, शिव नाडर यांच्या नावाचा समावेश आहे. तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादी जाहीर झाली. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले आहे. तर भारतीयांमध्ये अझीम प्रेमजी, शिव नाडर यांच्या नावाचा समावेश आहे. तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. यापूर्वी ते 242 व्या स्थानावर होते. मात्र, आता ते 154 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

"ब्लूमबर्ग बिलिनिअर इन्डेक्‍स' या संस्थेने 500 श्रीमंतांची यादी शुक्रवारी (ता. 15) जाहीर केली. श्रीमंताच्या यादीत अनेक भारतीयांची नावे आहेत. यामध्ये उद्योगपती अझीम प्रेमजी हे 57 व्या स्थानावर असून, त्यांची मालमत्ता 19.3 अब्ज डॉलर इतकी आहे. शिव नाडर हे 81 व्या स्थानावर आहेत आणि त्यांची मालमत्ता 15.7 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यापाठोपाठ उदय कोटक हे 95 व्या क्रमांकावर असून, त्यांची मालमत्ता 14.2 अब्ज डॉलर आहे.

गौतम अदानी : उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावाचा समावेश श्रीमंतांच्या यादीत आहे. ते यापूर्वी 242 व्या स्थानावर होते. मात्र, आता त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून, ते 167 व्या स्थानावर गेले आहेत. त्यांची मालमत्ता 9.36 अब्ज डॉलर इतकी आहे.

Image may contain: 1 person, smiling

- सायरस पूनावाला : श्रीमंतांच्या यादीत उद्योगपती सायरस पूनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. ते 199 व्या स्थानावर असून, त्यांची मालमत्ता 8.06 अब्ज डॉलर इतकी आहे.

Image may contain: 1 person

- नस्ली वाडिया : उद्योगपती नस्ली वाडिया यांच्या नावाचा समावेश श्रीमंतांच्या यादीत आहे. ते 251 व्या स्थानावर असून, त्यांची मालमत्ता 6.86 अब्ज डॉलर इतकी आहे.

Image may contain: 1 person, close-up

- राहुल बजाज : श्रीमंतांच्या यादीत उद्योगपती राहुल बजाज यांच्या नावाचा समावेश आहे. ते 341 व्या स्थानावर असून, त्यांची मालमत्ता 5.57 अब्ज डॉलर इतकी आहे.

Image may contain: 1 person, close-up

उद्योजकांची नावे, त्यांचा क्रमांक आणि मालमत्ता 

- लक्ष्मी मित्तल (110) : 12.8
- राधाकिशन दमानी (152) : 9.96 
- दीप्ती संघवी (233) : 7.13
- सावित्री जिंदाल (282) : 6.35
- वेणू गोपाळ बांगर (286) : 6.28
- सुनील मित्तल (307) : 5.95
- कुमार बिर्ला (340) : 5.61
- के. पी. सिंग (391) : 5.11
- विक्रम लाल (459) : 4.48.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gautam adanis wealth increased

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: