आपण यांना पाहिलेत का? खा. गौतम गंभीर बेपत्ता

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

''हरवले आहेत. तुम्ही यांना कोठे पाहिले आहे का? अखेरचे इंदूरमध्ये जिलेबी खाता दिसले होते. संपूर्ण दिल्ली त्यांना शोधत आहे.'' अशा आशयाचे पोस्टर दिल्लीभर लागले आहेत.

नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार गौतम गंभीर बैठक सोडून इंदूरला समालोचन करत असल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर तुफान टीका झाली होती. अशातच आता संपूर्ण दिल्लीभर गंभार बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. 

'...तर तुझाही विनोद कांबळी होईल'; पृथ्वी शॉ झाला ट्रोल!

''हरवले आहेत. तुम्ही यांना कोठे पाहिले आहे का? अखेरचे इंदूरमध्ये जिलेबी खाता दिसले होते. संपूर्ण दिल्ली त्यांना शोधत आहे.'' अशा आशयाचे पोस्टर दिल्लीभर लागले आहेत. दिल्लीतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीबद्दल संसदेच्या स्थायी समितीची बैठक घेतली जाणार होती मात्र, या बैठकीला खासदारांनीच दांडी मारली. या खासदारांमध्ये गौतम गंभीरही होता. 

Image

संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला न जाता गंभीर भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यासाठी इंदूरला समालोचन करण्यासाठी गेला होता. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि समालोचक जतिन सापरु यांच्यासह पोहे आणि जिलेबी खातानाचे फोटे व्हायरल झाले होते. 

मोहम्मद शमी कारकीर्दीत सर्वोच्च स्थानी; जडेजा, अश्विनही 'टॉप टेन'मध्ये!

18 खासदारांपैकी फक्त चार खासदारांनीच या बैठकीला उपस्थिती लावली त्यामुळे अखेर ही बैठक रद्द करावी लागली. या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने गंभारवर आम आदमी पक्षाने सडकून टीका केली तसेच दिल्लीच्या जनेतेच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने गंभीरने राजीनामा अशीही मागणी केली. 

''हे पोस्टर आपच्या कार्यकर्त्यांनीच लावले आहेत. गंभीरविरुद्ध उभा असलेला त्यांचा अमेदवार, अतिशी यांचा पराभव झाल्याने त्यांनी असे कृत्य केले आहे,'' असे मत भाजपच्या कार्यकर्त्याने व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir missing poster goes viral as he skips Delhi pollution meeting