गौतम गंभीर आता समाजकार्यातही पुढे! देणार खासदारकीचा संपूर्ण पगार

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

- खासदार म्हणून मिळणारा पगार देणार दिल्लीतील स्मशानभूमीच्या नवनिर्माणासाठी.

नवी दिल्ली : भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले टीम इंडियाचे माजी फलंदाज गौतम गंभीर आता समाजकार्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी आपला संपूर्ण पगार समाजकार्यासाठी दान करणार असल्याचे सांगितले. खासदार म्हणून मिळणारा पगार दिल्लीतील स्मशानभूमीच्या नवनिर्माणासाठी देणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर विजयी झाले आहेत. क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीनंतर आता गौतम गंभीर समाजकार्यात योगदान देणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले. त्यानंतर आता खासदार झाल्यानंतरही त्यांच्याकडून जबाबदारीने काम केले जात आहे. 

दरम्यान, गौतम गंभीरने गीता कॉलनी स्मशान घाट येथील परिसराचा नुकताच दौरा केला होता. त्यामुळे या स्मशानभूमीपासूनच कामाची सुरवात करण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir will Donate their MP salary