ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे उपोषणादरम्यान निधन

G.D. Agrawal began his fast unto death
G.D. Agrawal began his fast unto death

नवी दिल्ली : आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक आणि गंगा नदीच्या शाश्वतीसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचे आज निधन झाले. गंगा नदीच्या शाश्वतीसाठी 22 जूनपासून ते आमरण उपोषण करत होते. या उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गंगा नदी वाचविण्यासाठी गेल्या 109 दिवसांपासून जे. डी. अग्रवाल उपोषणाला बसले होते. त्यांना उत्तराखंड पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेले आणि त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांचे निधन झाले. गंगा वाचविण्यासाठी दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेवर लक्ष दिले नाही. आदरणीय सरांना आदरांजली, अशा शब्दांत प्रशांत भूषण यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

दरम्यान, अग्रवाल हे 22 जूनपासून ते दररोज तीन ग्लास पाणीच होते. या उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अग्रवाल हे 86 वर्षांचे होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com