gdp
gdp

भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांवर

नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली असून, आर्थिक विकासदर 8.2 टक्क्यांवर पोचला आहे. उत्पादन आणि कृषी क्षेत्रात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे. मागील वर्षी वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर अर्थव्यवस्थेचा वेग काहीसा मंदावला होता. त्यामुळे जीडीपीत घसरण होत विकासदर 5.6 टक्क्यांवर पोचला होता.

आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी मागील 15 तिमाहीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. उत्पादन आणि कृषी क्षेत्रांनी झालेल्या भरीव कामगिरीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी येत असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे.

2011-12 च्या आधारभूत किंमतीनुसार, 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 33.74 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या निवेदनात मांडण्यात आला आहे. मागील वर्षातील (2017-18) च्या पहिल्या तिमाहीत तो 31.18 लाख कोटी रुपये होता.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार, 2017-18 च्या दुसऱ्या सहामाहीत (ऑक्टोबर-मार्च) आर्थिक विकासाची गती वाढली असून तो वेग कायम राहून त्यात वाढ अपेक्षित आहे. तसेच, आरबीआयने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता अगोदर अंदाजित केलेल्या 6.7 टक्के जीडीपीत वाढ करत तो 7.4 टक्क्यांपर्यंत पोचेल असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com