भारतीय द्वीपकल्पात लाखो टन सागरी खनिज संपत्ती: जिऑलॉजिकल सर्व्हे

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

भारतीय द्वीपकल्पात तीन वर्षे केलेल्या संशोधनानंतर "जीएसआय'ने 1,81,025 वर्ग किलोमीटरच्या उच्च बिंदूघनतेच्या समुद्रातील वनस्पती व प्राणी शास्त्रासंबंधीचा पट्टा तयार केला आहे. यात भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चुनखडीचा एक हजार कोटी टन साठा असल्याचे जीएसआयने म्हटले आहे

कोलकत्ता - भारतीय द्वीपकल्पाच्या परिसरातील समुद्रामध्ये मौल्यवान धातू व खनिजे यांचा लाखो टन साठा आढळल्याची माहिती जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (जीएसआय) संशोधकांनी आज (सोमवार) दिली.

भारतीय द्वीपकल्पात तीन वर्षे केलेल्या संशोधनानंतर "जीएसआय'ने 1,81,025 वर्ग किलोमीटरच्या उच्च बिंदूघनतेच्या समुद्रातील वनस्पती व प्राणी शास्त्रासंबंधीचा पट्टा तयार केला आहे. यात भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चुनखडीचा एक हजार कोटी टन साठा असल्याचे जीएसआयने म्हटले आहे.

मंगळूर, चेन्नई, मन्नार खोरे, अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप येथे 2014 मध्ये प्रथम सागरी संपत्तीचा शोध लागला होता. चुनखडी, चुनखडीचा गाळ, हायड्रोकार्बनस. धातूयुक्त तळ यांसारख्या खनिज संपत्तीचा शोध लागला होता. समुद्रात अधिक खोलवर संशोधन केल्यास सागरी संपत्ती समृद्ध साठा आढळण्याची शक्‍यता भूगर्भशास्त्रज्ञांना त्या वेळी वाटत होती. त्यामुळे भारतीय द्विपकल्पात "जीएसआय'तर्फे संशोधन सुरू होते. संशोधनासाठी "समुद्र रत्नाकर', "समुद्र कौस्तुभ' व "समुद्र सौदीकामा' या अत्याधुनिक जहाजांचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: Geologists strike seabed ‘treasure’ in Indian waters