मोदींसमोर गीत गाणाऱ्या चिमुकल्याच्या वडिलांनी कुणाल कामराला झापलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal Kamra

मोदींसमोर गीत गाणाऱ्या चिमुकल्याच्या वडिलांनी कुणाल कामराला झापलं

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी जर्मनीच्या (PM Modi Germany Visit) दौऱ्यावर होते. यावेळी बर्लिन येथील भारतीयांकडून मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच एका भारतीय चिमुकल्यानं मोदींसमोर एक देशभक्तीपर गीत गायलं. त्यावरून अनेकांनी मीम्स बनवले आहेत. आता या चिमुकल्याच्या वडिलांनी कुणाल कामराला (Kunal Kamra) चांगलंच झापलं आहे. माझ्या मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा, असं ते म्हणाले.

हेही वाचा: पंतप्रधानांनी मिसळला लहानग्याच्या सुरात सूर; गाण्यावर धरला ताल

हा माझा मुलगा असून तो ७ वर्षांचा आहे. त्याने आपल्या मातृभूमीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी गीत गायलं. तो अजून लहान असला तरी त्याला त्याच्या देशावर कामरा तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे, असं त्या मुलाचे वडील गणेश पोळ म्हणाले. तसेच त्यांनी कामराचा उल्लेख कचरा असा केला. माझ्या लहान मुलाला तुमच्या गलिच्छ राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमच्या घाणेरड्या विनोदांवर काम करण्याचा प्रयत्न करा, असंही गणेश पोळ म्हणाले.

कुणाल कामराने केलेला विनोद काय? -

चिमुकल्यानं मोदींसमोर गायलेल्या गीताचा व्हिडिओ एडीट केला आहे. या व्हिडिओत 'मंहगाई डायन खात हैं' हे गाणं जोडून देशातील महागाईविरोधात भाष्य केलं आहे. काहींनी या व्हिडिओचं समर्थन केलं आहे, तर काहींनी कुणाल कामरावर टीका केली आहे.

नेमकं प्रकरण काय? -

पंतप्रधान मोदी २ मे रोजी बर्लिनला गेले होते. यावेळी भारतीयांनी मोदींची भेट घेतली. यावेळी एका लहान मुलानं त्यांच्यासमोर देशभक्तीपर गीत गायलं. तो गाणं गात असताना पंतप्रधान मोदींनी चुटकी वाजवत त्याला साथही दिली. त्याचं गाणं पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याच्या गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवत त्याचं कौतुक केलं आणि त्याला आशीर्वादही दिले.

Web Title: Germany 7 Year Old Boy Who Sung Song With Modi His Father Attack On Kunal Kamra Over Viral Memes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top