पेन्शनसाठी त्यांनी ठेवला आईचा मृतदेह 5 महिने लपवून

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

वाराणसी : उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये आपल्या पोटच्या मुलांनी स्वत:च्या आईचा मृतदेह तब्बल पाच महिने लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला मिळणारी पेन्शनची रक्कम मिळविण्यासाठी तिच्या मुलांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील वाराणसीतील भेलूपूरमधील कबीरनगर कॉलनीमध्ये घडली.

येथील सोनिका पार्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पाच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. संबंधित महिला सरकारी नोकरीत सेवेत होती. ती काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाली होती. त्यानंतर तिला सरकारकडून निवृत्तीवेतन मिळत होते. तिचा मृत्यू झाल्याचे समजल्यास आपल्या आईला मिळणारी निवृत्तीवेतन बंद होईल. त्यामुळे तिच्या मुलांनी पाच महिन्यापर्यंत तिचा मृतदेह लपवून ठेवला. मात्र, पोलिसांच्या चौकशीदरम्यान ही धक्कदायक बाब उघडकीस आली. 

दरम्यान, या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी महिलेच्या मुलांना अटक करण्यात आली असून, मुलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: For getting pension the body of his mother hide for 5 months