मोदींवर टीका केल्याने रामचंद्र गुहांना धमकी

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने त्यांना मोदींची इंदिरा गांधींशी आणि अमित शहा यांची संजय गांधींसोबत तुलना न करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे विचार करणारे व लिहिणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केल्याने ई-मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात येत असल्याचे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितले.

गुहा यांनी ट्विट करत याबाबतचा खुलासा केला. त्यांनी म्हटले आहे, की एकसारखे धमकीचे मेल मला पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका न करण्याचे लिहिण्यात आले आहे. या मेलमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य करण्यात आल्यावर धमकाविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहमध्ये ईश्वरी अंश असून जग बदलण्यासाठी त्यांना निवडले गेले आहे. त्यामुळे या दोघांवर टीका करणाऱ्यांना भगवान महाकाल चांगलीच शिक्षा करेल.

गुहा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने त्यांना मोदींची इंदिरा गांधींशी आणि अमित शहा यांची संजय गांधींसोबत तुलना न करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे विचार करणारे व लिहिणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. या प्रकरणी गुहा यांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Getting threats for criticising BJP, PM Modi ‘routine affair’: Ramachandra Guha