घाटकोपर विमान अपघात ; विमानातील चौघांसह पादचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

चार्टर्ड विमान घाटकोपर पश्चिमेत जागृती पार्क परिसरातील जीवदया लेनमधील परिसरात बांधकाम सुरु असलेल्या आवारात विमान कोसळले. या विमान अपघातात विमानातील महिला वैमानिकासह चौघांसह आणखी एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुंबई : मुंबईतील घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळले. या विमान अपघातात विमानातील महिला वैमानिकासह विमानातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एक पादचाऱ्याचाही यामध्ये मृत्यू झाला. हे विमान उत्तरप्रदेश सरकारच्या मालकीचे नसून, 'यूवाय'' अॅव्हिएशनचे असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव अवनिश अवस्थी यांनी दिली.  

>

c

चार्टर्ड विमान घाटकोपर पश्चिमेत जागृती पार्क परिसरातील जीवदया लेनमधील परिसरात बांधकाम सुरु असलेल्या आवारात विमान कोसळले. या विमान अपघातात विमानातील महिला वैमानिकासह चौघांसह आणखी एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल आणि आपातकालीन यंत्रणेचे पथक घटनास्थळी पोचले असून, बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 

Plane Crash

दरम्यान, इमारतीत आग लागल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर एक चार्टर्ड विमान कोसळल्याचे समोर आले. या परिसरातून विमानतळ जवळ असून लहान हेलीकॉप्टचे प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

plant and outdoor

Web Title: Ghatpokar Plane Crash Five dead