गाझियाबादमध्ये इमारत कोसळली;पाच मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापी किमान 12 जण अडकल्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. या इमारतीशेजारी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना स्फोटाचा मोठा आवाज ऐकु आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात कळविले

गाझियाबाद - उत्तर प्रदेश राज्यामधील गाझियाबाद येथील लोणी या भागामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्याने दोन महिला व तीन लहान मुले असे किमान पाच जण मृत्युमुखी पडले.

ही दुदैवी घटना आज (मंगळवार) पहाटे घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापी किमान 12 जण अडकल्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. या इमारतीशेजारी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना स्फोटाचा मोठा आवाज ऐकु आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात कळविले. घटनास्थळी पोलिसदल पोहोचले असून मदतकार्यही सुरु करण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

Web Title: Ghaziabad: 5 killed after two-storey building collapses