दोवाल यांच्यासोबतचे लोक पैसे देऊन आणलेले : गुलाम नबी आझाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजित दोवाल बुधवारी शोपियाँ जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेऊन जेवण करताना दिसले होते. या प्रकरणावरुन काँग्रेसच्या आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवताना दिसले होते. याविषयी बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन कोणालाही आणता येऊ शकते, असे वक्तव्य केले आहे.

केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजित दोवाल बुधवारी शोपियाँ जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेऊन जेवण करताना दिसले होते. या प्रकरणावरुन काँग्रेसच्या आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कलम 370 हटवल्यानंतर दोवाल काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते लोकांसोबत जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवान यांचीही भेट घेत आहेत.

आझाद म्हणाले, की पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. 

आझाद यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghulam Nabi Azad criticises Ajit Doval over interaction with locals