दिल्लीवासीयाच्या नजरेतून ‘कोरोनानुभव’

राजधानीत राहात असल्यामुळे सरकारकडून दिल्लीवासीयांना भक्कम उत्तम आधार मिळेल, असेच कुणालाही वाटेल. प्रत्यक्षात अनुभव आला तो खूपच वेगळा होता. तो अनुभव शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.
Coronavirus
Coronavirus System

दिल्ली आपली देशाची राजधानी. खरे तर जेथे राजा असतो ती राजधानी. प्रजा ही नेहमीच सत्ताधाऱ्यांना निवडून दिल्याबद्दल परतफेड कशी करतील, ही आशा-अपेक्षा धरून असतात. पण राजा प्रजेचे हाल कसे होऊ नयेत, हे पाहातो काय? दिल्ली (Delhi) किंवा देशात कोरोनाचा (Coronavirus) झटका ही रंगीत तालीम होती. पहिला कोरोनाचा प्रहार वयस्कर लोकांवर झाला. जसजसे संक्रमण वाढत गेले, तसे मृत्यू पण वाढले. रोज उठून झोपेपर्यंत कोरोनाविषयीच चर्चा होती. कट्ट्यावर बसून राजकीय गप्पांऐवजी (Political Gossip) कोरोनोच्या गप्पा ऐकू येऊ लागल्या. दिल्ली सरकार केंद्र सरकारवर (Central Government) व केंद्र सरकार राज्य सरकारवर हल्लाबोल करीत होते. यावेळी माणसे सावधानता बाळगत होते, काळजी घेत होते. हळूहळू करोनाचा प्रभाव कमी होत गेला. माणसे नेहमीप्रमाणे वावरू लागली. परिस्थितीचा आढावा घेऊन दिल्ली सरकारने सगळे निर्बंध कमी केले. माणसे सोशल डिस्टन्स (Social Distance) विसरू लागले, नाकावरील मास्क घसरू लागला, चहाच्या टपरीवर, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये भरभरून गर्दी होऊ लागली. (Ghyansham-Walimbe Coronavirus Delhi Trending News)

कोणत्या राज्यांमधे कोरोना कमी होतो, याची एकमेकांमधे चढाओढ सुरू झाली. वाहिन्यांनी कोरोनाचे देशातील आकडे देणे कमी केले. दिल्ली सरकार कोरोनाला कमी करण्याचे श्रेय घेऊ लागले, तर केंद्र सरकार आपण कसा कोरोनाला काबूत आणले हे सांगू लागले...तोच मागच्या दाराने करोनाने सशक्त व घातक सैन्य पाठवून जोरदार हल्लाबोल केला. कोणालाही दुसरी लाट भयंकर आहे, हे लक्षात येण्याच्या आत दिल्लीत बाधितांचे प्रमाण अडीचशेवरून ६००-८०० पर्यंत जाऊ लागले. हे आकडे पुढे काय वाढून ठेवले आहे, हे सांगण्यास पुरेसे होते. हॉस्पिटलमध्ये रूग्णांची गर्दी वाढू लागली. काळजी करू नका, भरपूर बेड उपलब्ध आहेत, असे मुख्यमंत्री सांगत होते. पण हाच आत्मविश्वास घातक ठरला. बघता बघता मुलांनाही लागण होऊ लागली. काही कळायच्या आत रुग्णांचा श्वास घुसमटू लागला.

या काळात लसीकरण सुरू झाले होते ते ६०वर्षे वयांवरील लोकांसाठी. तरीही माणसे कोरोना विसरल्यासारखेच वावरू लागले. हिंडणे, गप्पा, हॉटेलिंग चालूच होते. वास्तव स्वीकारायला त्यांचे मन तयार नव्हते. पहिल्या लाटेत घरामधे एकाला झाला तरी बाकी सदस्यांना होईलच, असे नव्हते. दुसऱ्या लाटेत मात्र कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होऊ लागली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, की कुठे खाटा उपलब्ध आहेत, याचे एक ॲप आम्ही काढले आहे व ते प्रत्येक नागरिकाने मोबाईलवर डाऊनलोड करा. हा चांगला प्रयत्न होता. पण ते ॲप कधी चाललेच नाही. तोपर्यंत लोकांची घरातील रुग्णाला घेऊन एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या नाही तर तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये सैरावैरा पळापळ सुरू झाली. आक्रोश ऐकू येऊ लागला. माणसांचे प्राण जाऊ लागले. हॉस्पिटलच्या दारात जाऊन लोकांना प्राण गमवावे लागले, याचे कारण ऑक्सिजन, इंजेक्शन,खाटा उपलब्ध नाहीत. स्मशानभूमीतही वेटिंग सुरू झाले. औषधांचा, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला. ९०० रुपयाचे दर ४० हजारापर्यंत गेले.

तेथील सेवकवर्गही जास्त पैसे मागू लागला. सगळीकडे भीतीचेच वातावरण पसरलेले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारचे धाबे दणाणले. मुख्यमंत्रीच हतबल झाल्याचे दिसू लागले. केंद्र सरकारला ते गयावया करताना दिसतात. केंद्र सरकारची यंत्रणाही डळमळीत झाल्याचे दिसते. दोघांतील समन्वयही नष्ट झाल्याचे स्पष्ट कळत होते. दुसरी लाट आली, त्याचवेळी मोठ्या सार्वजनिक जागा, महापालिकेची सभागृहे, ताब्यात घेऊन तेथे खाटा टाकल्या असत्या तर कमीत कमी १५ते २०हजार खाटा उपलब्ध झाल्या असत्या.

प्रश्न हाच उभा रहातो काेरोना होण्याची चूक जर माणसांची असेल तर बेडस् नसणे,ऑक्सिजन नसणे,याला जबाबदार कोण राज्य सरकार, केंद्र सरकार, की दोघेही?

एकमेकां साह्य करू...

दिल्लीतील मराठी भाषक रहिवाश्यांच्या सोसायट्यांनी बरीच काळजीपूर्वक पाऊले उचलली. पहिल्या व दुसऱ्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अंतर्गत निर्बंध घातले. बाहेरच्या सर्वांना सोसायटीत प्रवेश बंद केले. बाधित कुटुंबीयांना व्यवस्थापन समितीने व इतरांनाही मदतीचा हात दिला.‘आनंदवन पश्चिम विहार सोसायटी’मधील समितीने ज्यांना मदत पाहिजे, त्यांना संपर्काचे आवाहन केले.

तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर राहात असलेल्यांना बाहेरून मागविलेली भाजी- फळे पोहोचविण्यात आली. बिल्डिंगमधील लोकांनी गरजूंना डबे दिले. तसेच दर महिन्याला एक झूम मिटिंगवरून रहिवासी डॉक्टरांचा कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, याचा सल्ला घेण्यात आला. सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टरांनीही सर्व ती वैद्यकीय मदत सोसायटीच्या सभासदांना केली.

- घनश्याम वाळिंबे

Coronavirus
वाढत्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रातील दाेन जिल्हे केंद्राच्या यादीत

Ghyansham Walimbe Coronavirus Delhi Trending News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com