बुऱ्हाणच्या शाळेतील विद्यार्थिनी बारावीत सर्वप्रथम

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

आपल्या यशानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना शाहेरा म्हणाली, "मी खून आनंदी आहे. तयारी करताना ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते आणि माझे यश त्या सर्वांना अर्पण करत आहे. माझ्या घराजवळ परिस्थिती तणावपूर्ण असल्याने मी श्रीनगरला कोचिंगमध्ये शिकले. मला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असून सध्या मी एनईईटीची तयारी करत आहे.'

श्रीनगर (जम्मू-काश्‍मिर) - लष्कराच्या कारवाईत ठार झालेला दहशतवादी बुऱ्हाण वाणी ज्या शाळेत शिकला त्याच शाळेतील शाहेरा भट ही विद्यार्थिनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (HSC) राज्यात प्रथम आली आहे.

आठ जुलै रोजी वाणी ठार झाल्यानंतर राज्यात अशांतता पसरली होती. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ तणावपूर्ण परिस्थिती होती. या काळात संचारबंदी लागू करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये बंद होती. काही समाजकंटक शैक्षणिक संस्था पेटवून देत होते. अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची चिंता विद्यार्थी व्यक्त करत होते. फुटीरतावाद्यांनी तब्बल 133 दिवस बंद पाळला होता. या काळात राज्यात झालेल्या हिंसाचारात 94 जण ठार तर 15 हजार जण जखमी झाले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर शाहेरा भटने अभ्यास करून 500 पैकी 498 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. ती शासकीय शाळेत शिकत होती. विशेष म्हणजे याच शाळेत वाणीही शिकला होता. शाहेराचे घर जेथे होते, तेथील परिस्थिती तणावपूर्ण होती. त्यामुळे तिने श्रीनगरमध्ये जाऊन कोचिंग क्‍लासमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या यशानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना शाहेरा म्हणाली, "मी खून आनंदी आहे. तयारी करताना ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते आणि माझे यश त्या सर्वांना अर्पण करत आहे. माझ्या घराजवळ परिस्थिती तणावपूर्ण असल्याने मी श्रीनगरला कोचिंगमध्ये शिकले. मला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असून सध्या मी एनईईटीची तयारी करत आहे.'

Web Title: Girl from Burhan Wani's school in Kashmir shines in class 12 exams