बोहल्यावर चढण्याआधी तिने बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

येळ्ळूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते प्रकाश अष्टेकर यांची भाची मानीनी हीचे लग्न शनिवारी होते. मानीनी ही बेळगाव शहरातील कसाई गल्लीतील रहिवासी विजय ताशिलदार यांची कन्या.

बेळगाव : बोहल्यावर चढण्याआधी एका तरूणीने मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

येळ्ळूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते प्रकाश अष्टेकर यांची भाची मानीनी हीचे लग्न शनिवारी होते. मानीनी ही बेळगाव शहरातील कसाई गल्लीतील रहिवासी विजय ताशिलदार यांची कन्या. तिचा विवाह कोरे गल्ली शहापूर येथील विजय हंडे यांचे चिरंजीव यतीन यांच्याशी शनिवारी झाला. चव्हाट गल्लीतील जालगार मारूती मंदिर मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा झाला. पण विवाहासाठी आपल्या घरातून मंगल कार्यालयाकडे रवाना होण्याआधी मानीनी हिने मतदानाचा निर्णय घेतला.

मामा प्रकाश अष्टेकर व मैत्रीणीसोबत टेंगीनकेरे गल्लीतील उर्दू शाळेतील मतदानकेंद्रावर जावून मतदान केले.

Web Title: girl cast vote in Karnataka assembly election