मृत युवती स्मशानभूमीत उठून बसली अऩ्...

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

श्वेताला स्मशानभूमीत नेण्यात आले. अंतिमसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र, काही वेळातच ती उठून बसली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

भरतपूर (राजस्थान) : एका युवतीला सापाने दंश केला. सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंत्यसंस्काराची तयारी करून स्मशानभूमित नेण्यात आले. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी युवतीने श्वास सुरू केला आणि उठून बसली. यामुळे दुःखात बुडालेले कुटुंबीयांमध्ये आनंद पसरला.

एका 21 वर्षीय श्वेताला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्यामुळे श्वेताला भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबिय दुःखात बुडाले आणि तिला घरी आणून नातेवाईकांना कळविण्यात आले. कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. श्वेताला स्मशानभूमीत नेण्यात आले. अंतिमसंस्काराची तयारी सुरू असताना तिचा श्वास घेणे सुरू केले. श्वेता श्वास घेण्याच्या प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले. तिची नाडी तपासली असता ती जिवंत असल्याचे समोर आले. शिवाय, काही वेळातच ती उठून बसली. यामुळे दुःखात बुडालेले कुटुंबिय व नातेवाईकांमध्ये आनंदाचा धक्का बसला.

स्मशाभूमीतून श्वेताला घरी आणण्यात आले. पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. सर्पदंश झाल्यामुळे तिच्यावर पुन्हा योग्य उपचार करण्यात आले. सध्या तिची प्रकृती उत्तम आहे, असे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान, श्वेताच्या मृत्यूची व परत जीवंत झाल्याची माहिती परिसरामध्ये पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl coming back to life during funerals at rajasthan