ऑनलाइन क्लाससाठी मजूर बापाला घेता आला नाही स्मार्टफोन; लेकीनं केली आत्महत्या

वृत्तसंस्था
Thursday, 10 September 2020

मी तिच्यासाठी स्मार्टफोन विकत घेऊ शकत नसल्यामुळे ती नाराज झाली होती. मी जर तिला फोन घेऊन दिला असता तर आज माझी मुलगी वाचली असती, अशी माहिती अविराम बाउली यांनी पोलिसांना चौकशीत दिली आहे.

जलपईगुडी - 'मी रोजंदारी मजुरी करून घर चालवतो तरीसुध्दा मी माझी मुलगी शिकावी यासाठी प्रयत्न करत होतो पण परिस्थितीमुळे मी केवळ फी भरू शकत होतो. माझ्या मुलीला काही काळ ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनची गरज होती. मी तिच्यासाठी स्मार्टफोन विकत घेऊ शकत नसल्यामुळे ती नाराज झाली होती. मी जर तिला फोन घेऊन दिला असता तर आज माझी मुलगी वाचली असती, अशी माहिती अविराम बाउली यांनी पोलिसांना चौकशीत दिली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही जिवाला चटका लावणारी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. जलपईगुडी जिल्ह्यात ऑनलाईन क्लासेससाठी वडीलांनी  स्मार्टफोन घेऊन न दिल्यामुळे नाराज झालेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पोलिसांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. मल्ली कॉलेजमधील बीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी जयंती बाउली या विद्यार्थ्यीनीने सोमवारी रात्री सारीपुकुरी भागातील डबरीपारा गावात गळफास घेऊन आत्महत्या केली. क्रांती पोलिस चौकीचे प्रभारी दिलीप सरकार यांनी ही माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. याकाळात सरकारने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन क्लास सुरु केले होते. यास शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला पण ग्रामीण भागात या ऑनलाइन शिक्षण पध्दतीला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील पालकाची परिस्थितीही यास अडचण ठरत आहे. तसेच ग्रामीण भागाच नेट कनेक्टीवीटीचाही मोठी अडचण आहे. बऱ्याच भागात विजेची सोय नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून तिथली मुलं वंचित राहत आहेत. आता ऑनलाइन शिक्षण गरिब आणि ग्रामीण भागातील  खरंच एक पर्याय आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे.  ही अशी प्रकरणे समोर येत असताना सरकारने ऑनलाइन शिक्षणावर विचार करण्याची गरज आहे, असं मत आता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A girl commits suicide after her father Unable to give her a smartphone for online classes